दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या
दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या

दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील नागरिकांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या चोरांच्या मुसक्या कल्याण पोलिसांनी आवळल्या आहेत. हे चोर चोरी करण्यासाठी चोरीचीच दुचाकी वापरायचे. आतापर्यंत त्यांनी ११ दुचाकी चोरल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या हातातून ते थोडक्यात निसटले; पण शेवटी कल्याण पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले आहे. सुनील ऊर्फ सोन्या फुलारे (वय २०) व गणेश जाधव (वय२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा जोडीदार अब्दुल इराणी अजून फरार आहे. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

खडकपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी व सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झाली होती. आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात एक ५२ वर्षीय महिला पायी चालत जात असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ६० हजारांची सोनसाखळी चोरण्यात आली होती. याचा तपास करताना खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलिस निरीक्षक शरद झिने व त्यांच्या पथकास मोहने येथील लहुजीनगर परिसरात हे चोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुनील व गणेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुंबई, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, मुंब्रा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ९ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी व ६० हजार रु. किमतीची सोनसाखळी असा एकूण १० लाखांचा माल हस्तगत केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97874 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..