डोंबिवलीत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन
डोंबिवलीत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

डोंबिवलीत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २१ ः माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कदम यांचा निषेध करण्यासाठी बुधवारी (ता.२१) सकाळी शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेतर्फे कदम यांच्या फलक, प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘गद्दार गद्दार’ असा उल्लेख करून शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा धिक्कार केला.

या वेळी शिवसेनेचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, तात्या माने, महिला पदाधिकारी वैशाली दरेकर, कविता गावंड, अरविंद बिरमोळे, सतीश मोडक यांसह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. रामदास कदम यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करून राज्यातील तमाम महिला वर्गाचा अपमान केला आहे. अशी टीका करत आपल्या पायातील चपला काढत रामदास कदम यांच्या छायाचित्रावर महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारले. विधानसभेत वर्णी लागावी म्हणून रामदास कदम मी कसा ठाकरे घराण्याच्या विरोधात आहे हे दाखविण्यासाठी अशी गरळ ओकत आहेत. जवळ पद नसल्याने ते वेडे झाले आहेत. त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. त्यांना आता जनावरांच्या लम्पी आजाराचे इंजेक्शन देण्याची वेळ आली आहे. कदम यांनी पातळी सोडून आपले बेताल वक्तव्य सुरूच ठेवले तर डोंबिवली महिला आघाडी ते असतील तेथे जाऊन त्यांचे कपडे काढून त्यांची वरात काढतील, असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मंगला सुळे यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97877 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..