दिव्यातील गणेश विद्यामंदिर शाळेची मनसेकडून चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यातील गणेश विद्यामंदिर शाळेची मनसेकडून चौकशी
दिव्यातील गणेश विद्यामंदिर शाळेची मनसेकडून चौकशी

दिव्यातील गणेश विद्यामंदिर शाळेची मनसेकडून चौकशी

sakal_logo
By

दिव्यातील गणेश विद्यामंदिर शाळेची मनसेकडून चौकशी

दिवा, ता. २१ (बातमीदार) : दिवा शहरातील गणेशनगर येथील गणेश विद्यामंदिर या शाळेत थकीत शुल्क असणाऱ्या पालकांना शाळेकडून दंड आकारण्यात येत असल्याची तक्रार काही पालकांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात केली होती. त्यानुसार दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. २०) मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा संचालकांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोनाकाळापासून ज्या पालकांचे शुल्क बाकी आहेत, त्यांच्यासाठीच हे दंड लावण्यात आल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. तर कोरोनाकाळात बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे मुलांचे शुल्क भरायच्या राहिल्या. ही पालकांची बाजूही शाळा संचालकांना सांगून समजवण्यात आले. त्यावेळी शुल्क न भरल्याने शाळेची होणारी आर्थिक अडचण संचालकांनी बोलून दाखवली. शाळा आणि पालक दोघांची बाजू समजून घेतल्यानंतर यावर सुवर्णमध्य म्हणून किमान ३० ऑक्टोबरपर्यंत पालकांकडून दंड न आकारण्याचा तोडगा मनसेच्या शिष्टमंडळाने काढला. त्याला पालक आणि शाळा अशा दोघांनीही मान्यता दिली.

यावेळी शिष्टमंडळात दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे, मनविसे विभाग अध्यक्ष कुशाल पाटील, उपविभाग अध्यक्ष परेश पाटील, सोपान जाधव, शाखाध्यक्ष शैलेंद्र कदम, धनेश पाटील,आकाश भारती, गौरव कदम, सोनिश माधव, नम्रता खराडे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97881 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..