नवी मुंबईत आज स्वच्छतेचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत आज स्वच्छतेचा जागर
नवी मुंबईत आज स्वच्छतेचा जागर

नवी मुंबईत आज स्वच्छतेचा जागर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. २१ ः इंडियन स्वच्छता लीग उपक्रमाअंतर्गत महापालिकेतर्फे आज स्वच्छतेचा जागर होणार आहे. यानिमित्ताने सीबीडी-बेलापूर राजीव गांधी स्टेडियम, पामबीच मार्गावर मानवी साखळी, वाशीतील सिशोर येथे तृतीयपंथीयांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ होणार आहे. या महोत्सवांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून इंडियन स्वच्छता लीगसाठी नवी मुंबई महापालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईट्स’ हा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघात सर्व नवी मुंबईकर नागरिकांचा व विशेषत्वाने युवकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग असणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार, गायक व नवी मुंबईकर रहिवाशी पद्मश्री शंकर महादेवन हे नवी मुंबई इको नाईट्स संघाचे कर्णधार आहेत. इंडियन स्वच्छता लीगमध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ ही टॅगलाईन केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आली असून स्वच्छता कार्यात युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी स्वच्छताविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील सर्वात मोठा उपक्रम राजीव गांधी स्टेडियम सेक्टर ३ ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे सकाळी ८.३० वा. होणार आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व युवकांसोबत शंकर महादेवन, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती लक्षवेधक ठरणार आहे.
-----------------------------
कार्यक्रमाची रूपरेषा
- नवी मुंबई शहराचा क्विन्स नेकलेस म्हणून नावाजल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालय इमारत ते मोराज सर्कल सानपाडापर्यंत सकाळी ७.३० वा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झळकवत मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात येत आहे. महिला बचत गट व महिला संस्था आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य व विविध सेवाभावी संस्था प्रतिनिधी, तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होत आहेत.
- नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य हे पारसिक हिल, सीबीडी-बेलापूर या निसर्गस्थळी सकाळी ७ वाजता ओला, सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरणाचे महत्त्व प्रदर्शित करणार आहेत. तसेच परिसराची स्वच्छताही करणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी कांदळवन स्वच्छता मोहीमही राबविली जाणार आहे. सकाळी ७ वाजता, सेक्टर १० ए, मिनी सी शोअर, वाशी याठिकाणी तृतीयपंथी नागरिक ‘स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग’ असा संदेश प्रसारित करत सहभागी होणार आहेत.
----------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97883 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..