जुन्‍या पेन्शनसाठी ठाण्यात बाईक रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्‍या पेन्शनसाठी ठाण्यात बाईक रॅली
जुन्‍या पेन्शनसाठी ठाण्यात बाईक रॅली

जुन्‍या पेन्शनसाठी ठाण्यात बाईक रॅली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका आदींचे कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हा परिषदेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बुधवारी बाईक रॅली काढून आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.
राज्य सरकारने नोव्हेंबर २००५ पासून या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद केली आहे. ती पुन्हा लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन बाईक रॅली काढण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील व शहरातील कर्मचारी, अधिकारी येथील जिल्हा परिषदेच्या चौकात एकत्र जमले होते. दुपारी १२ वाजता या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली मुख्य बाजारपेठेतून सरळ कोर्ट नाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबली. या वेळी या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर या आंदोलनकर्त्यांच्‍या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या मागणीचा तातडीने विचार करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी दिली आहे.
जुनी पेन्शन योजना रद्द
२००४ पासून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या दबावाला बळी पडून देशातील सर्व समाज कल्याणकारी योजना बंद करायला सुरुवात केली. कल्याणकारी राज्य या आपल्या जबाबदारीतून शासन मुक्त होण्याचा नियमित प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय व राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा योजनेला विस्तारित व अधिक फायदेशीर स्वरूप देण्याच्या नावाखाली केंद्रीय राज्य व निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिली जाणारी जुनी पेन्शन योजना रद्द करून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) पुरस्कृत नवीन अंशदायी पेन्शन योजना, लोकप्रतिनिधी न्याय यंत्रणा व सशस्त्र सेना दल वगळून अन्य केंद्र, राज्य व निमसरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारही या योजनेमध्ये सहभागी झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97893 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..