बोईसरमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात
बोईसरमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात

बोईसरमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात

sakal_logo
By

मनोर, ता. २१ (बातमीदार) : नगर परिषद होण्याच्या मार्गावर असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न बोईसर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बोईसर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार शोधण्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये धावाधाव सुरू झाली आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कामगार आणि उद्योगांमुळे बोईसरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे बोईसर ग्रामपंचायतीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. बोईसर ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याने बोईसर ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. यंदा सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी (सर्वसाधारण) आरक्षित करण्यात आले आहे.
बोईसर ग्रामपंचायतीवर भाजप आणि शिवशक्ती संघटनेची सत्ता असून बोईसर ग्रामपंचायत हद्दीत भाजप- शिवसेनेचे प्राबल्य आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसेसारखे पक्ष ताकद राखून आहेत. काही वर्षांपूर्वी बोईसरमध्ये शिवेसेनेचे प्राबल्य होते; परंतु सद्यस्थितीत शिवसेनेची ताकद घटली झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बोईसरच्या शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेचे विधानसभा संघटक नीलम संख्ये आणि शहरप्रमुख मुकेश पाटील शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. असे असले तरी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97900 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..