विक्रमगड येथे आरोग्य तपासणी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड येथे आरोग्य तपासणी शिबीर
विक्रमगड येथे आरोग्य तपासणी शिबीर

विक्रमगड येथे आरोग्य तपासणी शिबीर

sakal_logo
By

विक्रमगड येथे आरोग्य तपासणी शिबीर
विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) ः डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट रुग्णालय पालघर व नवरंग मित्र मंडळ विक्रमगड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे विक्रमगड येथे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा विक्रमगड येथे संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक ३२, स्त्रिया २८, पुरुष २२ व मुले ९ अशा ९१ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात प्रामुख्याने मोतीबिंदू तपासणी, जनरल मेडिसिन, रक्तदाब तपासणी, होमिओपॅथिक उपचार, डायबिटीस, इ. सी .जी या तपासण्या करण्यात आल्या.
सदर शिबिरात डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट रुग्णालय पालघर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वी होण्यासाठी नवरंग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97901 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..