कचरा गाडीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा गाडीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
कचरा गाडीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कचरा गाडीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By

बेलापूर, ता. २१ (बातमीदार) ः नवी मुंबईतील तुर्भे औद्योगिक वसाहतीत रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला नवी मुंबई महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीने धडक दिली. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. प्रकाश कडू असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे.

सिडकोचे माजी कर्मचारी असलेले नेरूळ गावातील रहिवासी प्रकाश कडू हे पायी चालत जात असताना महापालिकेच्या घंटागाडी चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घालत रस्त्यावर उभ्या एका कारला जोरदार धडक दिली. कार व डंपरच्यामध्ये प्रकाश कडू चिरडले गेले. उपचारादरम्यान प्रकाश कडू यांचे निधन झाले. डंपरचालकाच्या बेपर्वाईमुळे घटना घडल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर प्रकाश कडू यांचा मोबाईल फोनही गायब झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97916 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..