कंपन्यांच्या नावाने सोन्याची तस्करी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपन्यांच्या नावाने सोन्याची तस्करी
कंपन्यांच्या नावाने सोन्याची तस्करी

कंपन्यांच्या नावाने सोन्याची तस्करी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने सुमारे ६५.४६ किलो वजनाचे ३३.४० कोटी रुपये किमतीचे ३९४ सोन्याचे बार जप्त केले आहेत. या तपासांच्या मालिकेमुळे देशाच्या ईशान्येकडील भागातून आणि लॉजिस्टिक कंपनीच्या देशांतर्गत कुरिअर मार्गाने परदेशी सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन मोडस ऑपरेंडी शोधण्यात मदत झाली आहे.
लॉजिस्टिक कंपनीच्या नावाने सोन्याची देशाच्या ईशान्येकडील राज्यांतून उर्वरित देशात तस्करी करण्याचा मनसुबा असल्याची माहिती गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या विशिष्ट माहितीनुसार एक टोळी सक्रियपणे लॉजिस्टिक कंपनीच्या नावावर मिझोराममधून विदेशी सोन्याची देशांतर्गत तस्करी करण्याची योजना आखत होती. ही तस्करी रोखण्यासाठी तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली. मालाची खेप कुठे येणार आहे, याचा माग काढला. गुप्तचर संचालनालयाला मुंबईला काही सोन्याचा ऐवज येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे १९ सप्टेंबरला मुंबईजवळील भिवंडी येथे गुप्तचर संचालनालयाने कारवाई करत १९.९३ किलो वजनाची आणि सुमारे १०.१८ कोटी मूल्याच्या विदेशी १२० सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.
...
बिहार, दिल्लीतही कारवाई
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयला सोन्याच्या अजून दोन खेपा येणार असल्याची माहिती मिळाली. दुसरी खेप बिहारमध्ये डीआरआयने जप्त केली. बिहारमधील एका लॉजिस्टिक कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये डीआरआयने सुमारे २८.५७ किलो वजनाच्या आणि सुमारे १४.५० कोटी रुपयांच्या १७२ विदेशी सोन्याचे बार ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे तिसरी खेप लॉजिस्टिक कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयात गुप्तचर संचालनालयाने कारवाई करत जप्त करण्यात आली. १६.९६ किलो वजनाचे आणि सुमारे ८.६९ कोटी किमतीचे १०२ विदेशी सोन्याचे बार जप्त करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97922 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..