घरफोडीत ९ लाखांचा ऐवज केला लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीत ९ लाखांचा ऐवज केला लंपास
घरफोडीत ९ लाखांचा ऐवज केला लंपास

घरफोडीत ९ लाखांचा ऐवज केला लंपास

sakal_logo
By

नवीन पनवेल (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील बारापाडा गावामध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत ९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, चोर नवनवीन क्लृप्त्या लढवून चोरी करत असल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात एका घरात घुसून १३ ते १५ तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. रात्री ३ च्या सुमारास हा प्रकार घडला. चोरांनी घरावरील कौले काढून आत प्रवेश करत कपाटातील १३ ते १५ तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखाची रोकड लुटली आहे. या घटनेचा तपास पनवेल पोलिस तपास करत असून चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97923 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..