३१४ कोविड मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३१४ कोविड मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी
३१४ कोविड मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी

३१४ कोविड मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः कोविडमध्ये कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला होता. त्याप्रमाणे राज्यभरातील विभाग नियंत्रकांकडून अशा वारसांची माहिती मागवण्यात आली आहे. राज्यभरात कोविडमुळे ३१४ मृत्यू झाले असून त्यापैकी २६४ वारसांचे अर्ज एसटी महामंडळ प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
आतापर्यंत एसटी प्रशासनाने २६४ पैकी ३४ जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली असून ३० जणांची पर्यवेक्षकीय पदांमध्ये नेमणुकीची कार्यवाही सुरू आहे, तर रिक्त जागांअभावी २७ उमेदवारांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहे. ८४ उमेदवारांनी आपल्या शिक्षणामुळे हक्क राखून ठेवला आहे. ८३ उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया थांबली असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या १० लाखांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. त्याप्रमाणे १० लाखांच्या मदतीसाठी ३२ अर्ज एसटी प्रशासनाकडे प्राप्त झाले असून आतापर्यंत ६ वारसांना प्रत्येकी १० लाखांचा मदत निधी देण्यात आला आहे.
...
सात उमेदवार नोकरीसाठी अपात्र
अद्याप २६ कर्मचाऱ्यांच्या मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसाह्य मिळालेले नाही. यापैकी १४ प्रकरणांमध्ये प्रशासनाला अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता झाली नसून सात उमेदवार नोकरीसाठी अपात्र असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97926 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..