जुन्या पेन्शनसाठी भरपावसात बाईक रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या पेन्शनसाठी भरपावसात बाईक रॅली
जुन्या पेन्शनसाठी भरपावसात बाईक रॅली

जुन्या पेन्शनसाठी भरपावसात बाईक रॅली

sakal_logo
By

कासा, ता. ता. २१ (बातमीदार) ः सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना अंशदायी नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना सुरू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता.२१) शिक्षकांनी पालघर, मनोर, कासा, तलासरी, डहाणू बाईक रॅली काढण्यात आली. २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना ही योजना बंद करण्यात आली आहे. नवीन पेन्शन मध्ये जे काही शिक्षक एनपीएस किंवा डीसीपीएस आहेत, त्यांना फक्त ३ हजार, ४ हजार असे पेन्शन मिळते. त्यामुळे ही फसवी योजना आहे, असा शिक्षकांचा आरोप आहे.

नवीन पेन्शन योजना डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये वर्गीकृत करण्यात आली. मात्र, बऱ्याच शिक्षकांना अद्याप त्याचा हिशोब किंवा पावत्या मिळालेल्या नाहीत. राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत काही शिक्षकांना नेमकी माहिती नाही. काम एकच असताना काही शिक्षकांना जुनी सरकारची पेन्शन योजना आहे. २००५ नंतरच्या शिक्षकांना शेअर मार्केटवर आधारित नवीन एनपीएस योजना हा दुजाभाव असल्याच्या नवीन पेन्शन योजनेमधील शिक्षकांच्या भावना आहेत. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात राज्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हा शिक्षक संघटनेने बाईक रॅली आयोजित केली होती. यामध्ये संघटना अध्यक्ष गणेश प्रधान, पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे, समन्वय मायकल घोन्सवीस, कार्याध्यक्ष रविंद्र ठाकूर, अनघा गायकवाड, सुचित्रा पाटील व मोठ्या प्रमाणावर शिक्षक सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97935 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..