भिंत कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिंत कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू
भिंत कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू

भिंत कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : कोपर रेल्वेपुलाच्या बाजूला लागून असणाऱ्या जुन्या भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक ती भिंत कोसळली. या दुर्घटनेत रेल्वे कत्राटदारांच्या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डोंबिवलीमधील शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मल्लेश चव्हाण (वय ३०, रा. घाटकोपर) आणि बंडू कुवासे (वय ४५, रा. घाटकोपर) असे मृत्यू झालेल्या मजुरांचा नावे आहेत. तसेच माणिक पवार (वय ६०, रा. दिवा), विनायक चौधरी (वय ४२, रा. घाटकोपर) आणि युवराज गुत्तलवार (वय ४५, रा. घाटकोपर) हे गंभीर जखमी झाले आहेत. मजुरांची परिस्थिती अत्यवस्थ असल्याने त्यांना सायन रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचे कळते. रेल्वेकडून या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97942 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..