मुंबईकरांचे ठरल्याने पित्त खवळलेय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांचे ठरल्याने पित्त खवळलेय
मुंबईकरांचे ठरल्याने पित्त खवळलेय

मुंबईकरांचे ठरल्याने पित्त खवळलेय

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २१ ः महापालिका निवडणुकीतला पराभव स्पष्ट दिसत असल्याने पित्त खवळलेय, असा टोमणा मारत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली. मुंबईकर अतिवृष्टीचा सामना करत होते, तेव्हा वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते, त्याचे काय करायचे, असा प्रश्न शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. मोदी-शहा मुंबईत येणार म्हणून घाबरलेले नेते आता बोलत आहेत, असेही शेलार यांनी नमूद केले.
मुंबई संकटात असते, तेव्हा कुठेही न दिसणारे ठाकरे श्रेय लाटण्याचा प्रयत्न तेवढा करतात, असे नमूद करत ट्वीटमध्ये २६/११च्या हल्ल्यातही मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते. नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता.
आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का? बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचवताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले, तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे, असे सांगत हे घरी पोहोचले. कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पीपीई कीट घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते, तेव्हा तुम्ही घरी बसला होतात. स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे भाजपचे शेकडो कार्यकर्ते तुम्हाला कसे दिसणार? तुम्ही घरी बसलात होतात, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97944 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..