पनवेलमध्ये लम्पी प्रतिबंधासाठी उपाययोजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये लम्पी प्रतिबंधासाठी उपाययोजना
पनवेलमध्ये लम्पी प्रतिबंधासाठी उपाययोजना

पनवेलमध्ये लम्पी प्रतिबंधासाठी उपाययोजना

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २२ (वार्ताहर) ः लम्‍पी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्‍याने राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. पनवेल तालुक्याच्या वेशीवर लम्‍पीसदृश आजाराची लक्षणे आढळल्‍याने पाले खुर्द आणि वावंजेतील गुरांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; पशु वैद्यकीय विभागाने विशेष खबरदारी घेतली असून पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी आढावा घेतला आहे.
राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यांत अनेक जनावरांना लम्‍पी आजाराची लागण झाली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात आधी कर्जतमध्ये आठ बैलांना बाधा झाल्‍याचे आढळले. त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून सर्वच तालुक्ं‍यात गुरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यातील दोन गावांतील गुरांमध्ये लम्पीसदृश लक्षणे आढळल्‍याने त्‍यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लम्पी केवळ गोवंश व म्‍हैस‍ वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्‍वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असल्‍याने पशुपालकांनी गुरांची योग्‍य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
पनवेल तालुका शहरीबहुल असला तरी आजही शेती आणि पशुधन काही गावांमध्ये दिसून येते. या ठिकाणी गोठे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषकरून म्‍हशीच्या गोठ्यांची संख्या जास्‍त आहे. तालुक्यात जवळपास १३,२२६ जनावरे आहेत. त्यापैकी ४,५७२ गोवंशीय व ५,६६० म्‍हैसवर्गीय आहेत. तालुका प्रशासनाने गावागावांत सर्वेक्षण सुरू केले आहे.

गोठ्यांमध्ये फवारणी
पनवेल महापालिका क्षेत्रात १७५ गोठे असून आठशे जनावरे आहेत. म्‍हशींची संख्या याठिकाणी जास्त असून लम्‍पी प्रतिबंधासाठी गोठ्यांमध्ये फवारणी करण्यात आली आहे. तसेच गोशाळेमध्ये सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वावंजे आणि पाले खुर्द या गावांमध्ये लम्पीसदृश स्थिती निर्माण झाल्याने जनावरांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

तालुक्‍यातील पशुधन
एकूण गुरे - १३, २२६
गोवंशीय - ४,५७२
म्‍हैस वर्गीय - ५,६६०

महापालिका क्षेत्र
गोठे - १७५
पशुधन - ८००

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97948 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..