ग्रामपंचायतीची घंटागाडी पन्हा धावू लागली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतीची घंटागाडी पन्हा धावू लागली
ग्रामपंचायतीची घंटागाडी पन्हा धावू लागली

ग्रामपंचायतीची घंटागाडी पन्हा धावू लागली

sakal_logo
By

ग्रामपंचायतीची घंटागाडी पन्हा धावू लागली
सकाळच्या वृत्तानंतर आली प्रशासनाला जाग; खोडाळा गावाची कचराकोंडी सुटली

सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २२ (बातमीदार) ः मोखाडा तालुक्यात साथींच्या आजाराने नागरीक त्रस्त झालेले असताना, मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतची घंटागाडी गेली दहा दिवसांपासून बंद झाली होती. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. यासंदर्भात सकाळने बुधवारी (ता. २१) ‘रस्तेच बनले कचरा डेपो’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून हे वास्तव चव्हाट्यावर आणले होते. त्यामुळे झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले. सकाळच्या वृत्ताची दखल घेत, नादुरुस्त असलेली घंटागाडी तातडीने दुरूस्त करण्यात आली असुन ती गुरुवारपासून गावातील रस्त्यावर कचरा गोळा करत धाऊ लागली आहे. त्यामुळे खोडाळा गावातील कचराकोंडी सुटली असुन खोडाळा ग्रामस्थांनी सकाळचे अभिनंदन केले आहे.
मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीची घंटागाडी गेल्या दहा दिवसांपासून बंद पडली होती. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेत होते. ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी घंटा गाडी सुरू करण्याबाबत अनेकदा प्रशासनाला सांगितले होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांनाही दाद दिली नाही. गावात डेंग्यू, मलेरिया, निमोनिया तसेच वातावरण बदलाचे आजार बळावलेले असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या आळशीपणामुळे गावात कचराकोंडी झाली होती. तसेच गावातील चारही रस्ते डम्पींग ग्राऊंड बनले होते.
अखेर, सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याच दिवशी नादुरुस्त घंटागाडी नाशिकला नेऊन रातोरात दुरूस्त करून आणण्यात आली. गुरुवारपासून (ता. २२) घंटागाडी गावात कचरा गोळा करत धाऊ लागली आहे.


मोखाडा ः खोडाळा बाजारपेठेत कचरा गोळा करताना ग्रामपंचायतीची घंटागाडी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97958 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..