ज्येष्ठांसोबत अल्झायमर डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठांसोबत अल्झायमर डे
ज्येष्ठांसोबत अल्झायमर डे

ज्येष्ठांसोबत अल्झायमर डे

sakal_logo
By

धारावी, ता. २२ (बातमीदार) : धारावीतील ज्येष्ठांसोबत अल्झायमर डे व ज्येष्ठांच्या समस्यांबाबतचे सत्र मंगळवारी (ता. २०) नवी चाळ येथील जय भवानी क्रीडा मंडळ मंडपाच्या आवारात पार पडले. याचे आयोजन वुमन वेल्फर फोरम व धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ज्येष्ठांना मिळणारे अधिकार, त्यांच्या आजाराबद्दल, तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळावे, त्याकरिता फेस्कॉन संस्थेचे मुंबई अध्यक्ष शरद डिचलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या विभागात ज्येष्ठांकरिता एक संघ स्थापन करावा, अशी सूचनाही केली. या वेळी डॉ. विद्या शेनॉय यांनी अल्‍झायमर आजाराबद्दल घ्यावयाची दक्षता, उपाय व आहाराविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित ज्‍येष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांना शेनॉय यांनी योग्य ते मार्गदर्शन करून सल्ला दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97977 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..