स्मशानभूमी सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने करा : भोईर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने करा : भोईर
स्मशानभूमी सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने करा : भोईर

स्मशानभूमी सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने करा : भोईर

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती जी अंतर्गत नायगाव पूर्वपट्टीतील अनुक्रमे बापाणे, कोल्ही व कामण स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. या विभागांचे झपाट्याने नागरीकरण होत आहे; परंतु स्मशानभूमींची दुरवस्था झाली असून येथे अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या स्मशानभूमी सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने करण्याची मागणी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
बापाणे, कोल्ही व कामण विभाग क्षेत्रफळाने मोठे असून त्यामध्ये बहुतांशी ग्रामीण भागांचा समावेश आहे. सध्या या तीनही विभागातील स्मशानभूमी परिसरामध्ये सुविधांची वानवा आहे. तसेच अनेक साधने नादुरुस्त झालेली आहेत. त्यामुळे प्रेत दहनासाठी येणारे कुटुंबीय, गावकरी तथा नागरिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या स्मशानभूमींचे सुशोभीकरणाची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97981 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..