लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई
लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई

लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : लम्‍पी त्वचारोगाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविल्यामुळे लम्पी त्वचा रोगनियंत्रणात आहे. या रोगाने बाधित पशुधनावरील उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकारमार्फत मोफत करण्यात येत असून लसीकरण, उपचार व शवविच्छेदन या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत दिल्या जात आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यास एक कोटी निधी तातडीने उपलब्ध करण्यात आला आहे. या रोगामुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण २७ केंद्रबिंदू आहेत. एकूण १०४ जनावरे बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण चार जनावरे या रोगाने मृत झाली आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ८०,५३२ इतके गोवर्गीय पशुधन असून त्यापैकी आतापर्यंत १६,९६५ जनावरांचे लसीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. लम्पी त्वचारोगाचा प्रसार व हानी पाहता राज्य सरकारमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे लम्पी त्वचारोग नियंत्रणात आणण्यास पशुसंवर्धन विभागास यश येत आहे. लम्पी त्वचारोगाचा प्रसार रोखण्याकरिता सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व जनावरांचे लसीकरण ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. तोडणकर यांनी दिली आहे. या रोगाने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकास नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी २५ हजार आणि मृत वासरासाठी १६ हजार रुपये भरपाई मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यात शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर औषधांची ड्रग्स बँक देण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97994 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..