मल्टिप्लेक्समध्ये आज ७५ रुपयांत सिनेमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मल्टिप्लेक्समध्ये आज ७५ रुपयांत सिनेमा
मल्टिप्लेक्समध्ये आज ७५ रुपयांत सिनेमा

मल्टिप्लेक्समध्ये आज ७५ रुपयांत सिनेमा

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः शुक्रवारी (ता. २३) संपूर्ण देशात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा होणार आहे. या निमित्ताने नागरिकांना कोणत्‍याही मल्टिप्लेक्समध्‍ये ७५ रुपयांत सिनेमा पाहता येणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने या उपक्रमाची घोषणा केली आहे.
यामध्ये मुव्हीमॅक्स ही सिनेमागृहांची शृंखला देखील सहभागी होणार आहे. चित्रपट उद्योगाचा विकास आणि वाढ साजरी करण्यासाठी, मुव्हीमॅक्स सवलतीच्या दरात चित्रपट तिकिटांची किंमत निश्चित करण्याच्या घोषित कार्यक्रमात सहभागी होणार असल्‍याचे सांगण्यात आले आहे.
दरम्‍यान उद्या ‘धोका राऊड द कार्नर’, ‘चूप’, ‘प्रेमगीत ३’ हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अशावेळी मल्टिप्लेक्स असोसिएशन ७५ रुपयांत सिनेमा दाखवत असल्‍याने प्रेक्षकांना मेजवानी मिळाली आहे.
दरम्‍यान, या उपक्रमाबद्दल मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सचिव प्रकाश चाफळकर यांनी सांगितले की, उद्या देशभरात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा होत आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना केवळ ७५ रुपयांत सिनेमा दाखवण्याचा निर्णय आम्‍ही घेतला आहे.
सिनेलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कनाकिया म्हणाले की, ‘राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आम्ही मुव्हीमॅक्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट दाखवणार आहोत. चित्रपट रसिकांचे प्रेम आणि समर्थन स्वीकारण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, ज्यांच्यामुळे चित्रपटगृहांना कोरोनानंतर व्यवसाय पुन्हा सुरू करणे शक्य केले आहे. हा दिवस त्याचे कौतुक करण्याचा आहे. कोरोनाकाळातील आव्हानांमध्ये आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या चित्रपटप्रेमींचे मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी देखील हा दिवस समर्पित असल्‍याचे त्‍यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97999 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..