वंदे भारत एक्सप्रेस सोमवारपासून धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदे भारत एक्सप्रेस सोमवारपासून धावणार
वंदे भारत एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

वंदे भारत एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

sakal_logo
By

पालघर, ता. २२ (बातमीदार)ः गेल्या तीन वर्षांपूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या रेल्वे गाडीची चाचणी नुकतीच अहमदाबाद-मुंबई या मार्गावर पार पडली. या चाचणीदरम्यान ४९१ किलोमीटरचे अंतर सव्वा पाच तासांत या गाडीने पार केले. आगामी काळात विविध थांबे गृहीत धरून सहा तासांत मुंबई-अहमदाबाद दरम्यानचे अंतर ही गाडी पार करेल. या गाडीची चाचणी संपन्न झाल्याने आता ही गाडी येत्या सोमवार (ता. २६) पासून अहमदाबाद ते मुंबई अशी धावणार आहे. ही गाडी अहमदाबाद येथून सकाळी ७.२५ वाजता सुटून दुपारी १.३० वाजता मुंबईला पोहोचेल, तसेच परतीच्या प्रवासात दुपारी २.४० वाजता मुंबईहून सुटून रात्री ९.०५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल, असे नियोजन करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
वायुगती आकर्षक स्वरूप, अधिक वेग क्षमता असलेल्या या गाडीत ११२८ आसन व्यवस्थेची क्षमता आहे. सोबत माहिती प्रणाली, सीसी टीव्ही कॅमेरा, स्वयंचलित सरकते दरवाजे, धूम्रपान सतर्कता, दोन गाड्यांची धडक टाळण्यासाठीची प्रणाली व सुरक्षा संबंधित सोयी-सुविधांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98009 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..