कळव्यात डोंगरालगत रस्ता खचल्याने २५ दुकानांच्या भिंतीना तडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यात डोंगरालगत रस्ता खचल्याने २५ दुकानांच्या भिंतीना तडा
कळव्यात डोंगरालगत रस्ता खचल्याने २५ दुकानांच्या भिंतीना तडा

कळव्यात डोंगरालगत रस्ता खचल्याने २५ दुकानांच्या भिंतीना तडा

sakal_logo
By

कळवा, ता. २२ (बातमीदार) ः वाघोबा नगर येथील पारसिक बोगद्याजवळ जलद रेल्वे मार्गाच्या बाजूला रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे संरक्षण भिंतीचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पारसिक डोंगराजवळ खोदकाम करण्यात आले होते. बोगद्याच्या वर वाघोबा नगर व भास्कर नगरला जोडणारा डोंगरालगतचा रस्ता गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास खचल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या जवळपास २५ दुकानांच्या भिंतींना तडा गेल्याची घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन येथील दुमजली चार दुकानांचे स्थलांतर केले, तर उर्वरित २१ दुकानांना धोकादायक जाहीर करून दुकानासमोर धोकपट्टी लावण्यात आली आहे; तर या दुकानदारांना रात्री दुकानात न झोपता महापालिका शाळेत झोपण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेचे वृत्त समजताच माजी मंत्री व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98019 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..