कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई
कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई

कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई

sakal_logo
By

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : कर्णकर्कश्श आवाज करणारे सायलेन्सर व हॉर्न बसवलेल्या दुचाकींवर मिरा-भाईंदर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
दुचाकीला आवाज करणारे सायलेन्सर व हॉर्न बसवून वेगाने फिरणाऱ्यांचा मिरा-भाईंदरमध्ये सुळसुळाट झाला आहे. या आवाजाचा इतर वाहनचालकांना त्रास तर होतोच, शिवाय रस्त्याने चालणारे पादचारी देखील या आवाजाने दचकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. या दुचाकींविरोधात वाढत्या तक्रारींची दखल घेऊन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी आवाज करणाऱ्या दुचाकींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश कड यांनी सहकाऱ्यांसह बुधवारी सायंकाळपासून दुचाकींवर कारवाई करायला सुरुवात केली असून मोटर वाहन कायद्यांतर्गत १२०० रुपये दंड आकारला जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून व गस्त घालून वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98020 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..