नागपूर-मडगाव विशेष रेल्वेला रोहा, खेड, रत्नागिरीसह कणकवली कुडाळला थांबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर-मडगाव विशेष रेल्वेला रोहा, खेड, रत्नागिरीसह कणकवली कुडाळला थांबे
नागपूर-मडगाव विशेष रेल्वेला रोहा, खेड, रत्नागिरीसह कणकवली कुडाळला थांबे

नागपूर-मडगाव विशेष रेल्वेला रोहा, खेड, रत्नागिरीसह कणकवली कुडाळला थांबे

sakal_logo
By

रोहा, ता. २२ (बातमीदार) ः नागपूर ते मडगावदरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ आणि कोकणाला जोडणारी ही गाडी आता ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवासीवर्गातून अशा गाडीची मागणी होत होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नागपूर ते मडगाव (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता ही गाडी २० ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगावपर्यंत चालवली जाणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाडीला आता रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहचेल. मडगाव ते नागपूरदरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ती नागपूरला पोहचेल. नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवीम तसेच करमाळी या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूने मिळून अठरा फेऱ्या होणार आहे.

कोट :
कोकण मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेच्या फेरीत वाढ केल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सोईचे होणार आहे. हक्काच्या कोकण रेल्वेमुळे कोकणवासीयांना नक्कीच फायदा होईल.
- जमील शेख, रेल्वे प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98022 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..