काकस्पर्श दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काकस्पर्श दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ
काकस्पर्श दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ

काकस्पर्श दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : कावळा हा पक्षी तसा कायम दुर्लक्षीत असतो. पण पितृ पंधरवडा सुरु झाला की कावळ्यांना सुगीचे दिवस येतात. असे असले तरी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात कावळ्याची संख्या कमी होऊ लागली आहे. कारण वाढत्या वृक्षतोडीमुळे कावळ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागासह शहरात कावळेही दुर्मिळ झाले आहेत.
गणशोत्सवानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरु होतो. या दिवसात पित्रांना अर्थात कुंटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची फळे, वस्तू आणि जेवण कावळ्यांच्या नावाने वाढण्याची ही परंपरा आहे. त्यामुळे या दिवसांत कावळ्याला महत्त्व असते. आजही ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. मात्र सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व पक्ष्यांना लागणारे खाद्य मिळणे कठीण झाल्याने कावळ्यांची संख्या कमी होत आहे. परिणामी पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले आहेत.
कावळा हा माणसाच्या वसाहतीजवळ राहाणारा तरीही घरात न येणारा असा पक्षी. एप्रिल ते जून दरम्यान कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. जन्मलेल्या पिलाचे पोषण नर-मादी दोघेही घेतात. पण त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढत्या बांधकामांमुळे झाडे तोडण्यात आली, त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. गर्दीच्या भागात तर कावळ्यांसह इतर पक्षीही दिसेनासे झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98026 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..