नवरात्रोत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज
नवरात्रोत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज

नवरात्रोत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : येत्या २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी मुंबईत वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांनी सवलतीच्या दरात वीज देणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईतील बेस्ट, अदाणी, टाटा पॉवर आणि महावितरणच्या क्षेत्रातील वीजग्राहकांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा देण्यात येणार आहे. तसेच नवरात्रोत्सवासाठी वीज जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहनही कंपन्यांनी केले आहे.
मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेत सवलतीच्या दरातील वीजजोडणीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन वीज कंपन्यांना केले आहे. सवलतीच्या दरात वीजजोडणी देण्यात येणार आहे, ती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.
नवरात्रोत्सव मंडळांना वीज कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचीही सुविधा दिली आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शकानुसार वीज कंपन्यांना घरगुती वीज दराने वीज जोडणी देण्यात येणार आहे. ही वीज जोडणी मंडळे तसेच भाविकांच्या दृष्टीने अतिशय सुलभ आणि सुरक्षित असल्याचेही वीज कंपन्यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे. वीज कंपन्यांनी मोबाईल मिस कॉल आणि वॉट्स ॲपची सुविधा दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98032 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..