मुंबईत २,२०३ गायींना लम्पी प्रतिबंधात्मक लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत २,२०३ गायींना लम्पी प्रतिबंधात्मक लस
मुंबईत २,२०३ गायींना लम्पी प्रतिबंधात्मक लस

मुंबईत २,२०३ गायींना लम्पी प्रतिबंधात्मक लस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : प्रामुख्याने गोजातीय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना सातत्याने करण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत २ हजार २०३ गोजातीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
२०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैसवर्गीय जनावरे आहेत. निर्धारित प्राधान्यक्रमानुसार यापैकी गोजातीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. उर्वरित गोजातीय जनावरांचे लसीकरण पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. ज्यांच्या गोजातीय जनावरांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याकडे ०२२-२५५६-३२८४ आणि ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधून लसीकरणाबाबत विनंती नोंदवावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
...
सर्वेक्षण आणि उपाययोजना
महापालिकेच्या आरोग्य खात्याने १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असलेला चमू गठीत केला आहे. या चमूद्वारे तबेले व गोशाळा यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या कीटकनाशक विभागास गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात फॉगिंग आणि कीटक नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98037 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..