मुंबईत नवीन वाहनांची नोंदणी बंद करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stop registering new vehicles in Mumbai
मुंबईत नवीन वाहनांची नोंदणी बंद करा!

मुंबईत नवीन वाहनांची नोंदणी बंद करा!

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मुबईत नवीन वाहनांची नोंदणी त्वरित बंद करावी; अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा धारावीचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते बाबुराव माने यांनी दिला आहे.
विदेशांच्या धरतीवर रस्त्यावरील वाहनासंदर्भाची नियोजन करावेत आणि नवीन वाहनांचा ना हरकत परवाना देण्यासाठी महिनाभरात तज्ज्ञ व्यक्तींची समिती नियुक्त करावी, यासह इतर महत्त्वाच्या सूचना बाबुराव माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केल्या आहेत.

यासंदर्भात सरकारने निर्णय न घेतल्यास शिवसेना मुंबईतील रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. बाबुराव माने यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबई प्राकृतिकरीत्या फुगत चालली आहे. मुंबईची लोकसंख्या २ कोटी ४ लाख ११ हजार २७४ इतकी आहे. शहरात कार १२,५२,२४६, दुचाकी २५,४१,०३३, ऑटो रिक्षा २,३३,३२५, टुरिस्ट टॅक्सी ७९,९४४, मीटर टॅक्सी ४४,१७१, स्कूल बस ३,०८६ आहेत. वाहनांची संख्या ४२ लाख ८१ हजार २५१ इतकी प्रचंड आहे.

वाहनांची घनता
मुबईतील वाढती वाहने आणि बाहेरगावावरून येणारी अंदाजे १० हजार वेगवेगळी वाहने यांची संख्या लक्षात घेता दररोज ५० लाख वाहने रस्त्यावर येतात. यात रस्त्यांवरची २० टक्के जागा वाहनांच्या पार्किंगसाठी व्यापली जात आहे. राज्याच्या जवळपास चारपट मुंबईत वाहनांची घनता असल्याचे माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनात आणून दिले आहे.

अनावश्यक वाहनांवर दंड आकारा!
मुंबईत नवीन वाहनांची नोंदणी त्वरित बंद करावी. घरटी असलेल्या अनावश्यक वाहनांच्या संख्येचा आढावा घ्यावा. अनावश्यक वाहनांवर दंड आकारून ती सरकारजमा करावीत. ज्यांना अत्यावश्यक आहेत त्यांनाच नवीन वाहनांचे परवाने द्यावेत. यासंदर्भात राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा; अन्यथा शिवसेना मुंबईतील रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माने यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98044 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..