शनिवारी वझे कॉलेजतर्फे ‘ध्रुवा’ संस्कृत महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवारी वझे कॉलेजतर्फे ‘ध्रुवा’ संस्कृत महोत्सव
शनिवारी वझे कॉलेजतर्फे ‘ध्रुवा’ संस्कृत महोत्सव

शनिवारी वझे कॉलेजतर्फे ‘ध्रुवा’ संस्कृत महोत्सव

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः मुलुंड येथील वि. ग. वझे कॉलेजच्‍या संस्कृत विभागाने शनिवारी (ता. २४) ‘ध्रुवा’ संस्कृत महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे उद्‌घाटन सकाळी नऊ वाजता होईल. यावेळी ख्यातनाम अभिनेत्री, निवेदिका डॉ. समीक्षा गुजर-जोशी उपस्थित असतील. इयत्ता सहावी ते बारावी, पदवी महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि खुला गट यामध्‍ये सहभागी होऊ शकतील, असे आयोजकांनी सांगितले आहे. या महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष आहे. गेली दोन वर्षे ऑनलाईन पद्धतीने महोत्सव केल्यानंतर पुन्हा विद्यार्थी-शिक्षकांमध्ये नवी ऊर्जा यावी, हे मागणे घेऊन देवीचा जागर करावा या उद्देशाने या वर्षी ‘ध्यानम् आदिशक्तेः’ या संकल्पनेवर आधारित खजिनाशोध, नाटक, प्रश्नमंजुषा कथाचित्र, कथाकथन अशा खेळांचा समावेश केला आहे. दिवसाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने होईल. यावेळी पावनखिंड-फर्जंद सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित राहतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98045 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..