उल्हासनगरात अनधिकृत गाळे जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात अनधिकृत गाळे जमीनदोस्त
उल्हासनगरात अनधिकृत गाळे जमीनदोस्त

उल्हासनगरात अनधिकृत गाळे जमीनदोस्त

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) ः रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या कॅम्प नंबर- १ मच्छी मार्केटमधील २० गाळ्यांवर उल्हासनगर महापालिकेने जेसीबी फिरवून हे गाळे जमीनदोस्त केले आहेत.
उल्हासनगर पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेची भाजी मंडई आहे. मंडईच्या पुढे मटण मच्छी विक्रेत्यांनी २० अनधिकृत गाळे बांधल्याने हा रस्ता जेमतेम १० फुटाचा झाला होता. त्यापैकी काही गाळे चक्क गटारावर उभारण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. पालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवल्यावर गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
शेवटी आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशान्वये अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी गणेश शिंपी, प्रभाग समिती-१चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी निष्काशन विभागाच्या टीमसोबत येथील गाळ्यांवर जेसीबी फिरवून गाळ्यांना जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे येथील १० फुटाचा रस्तारुंदीकरण करून ३० फुटाचा होणार असल्याने वाहतूक कोंडी संपुष्टात येणार आहे. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यापुढेही शहरातील अनधिकृत बांधकामांवर आणि रस्तारुंदीकरणात येणाऱ्या दुकान गाळ्यांवर महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98050 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..