घाटकोपर मधील अपघातग्रस्त जखमींची शिवसैनिकांकडून विचारपूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपर मधील अपघातग्रस्त जखमींची शिवसैनिकांकडून विचारपूस
घाटकोपर मधील अपघातग्रस्त जखमींची शिवसैनिकांकडून विचारपूस

घाटकोपर मधील अपघातग्रस्त जखमींची शिवसैनिकांकडून विचारपूस

sakal_logo
By

अपघातातील जखमींची
शिवसैनिकांनी घेतली भेट
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेकडील गरोडिया नगरमध्ये बुधवारी (ता. २१) कार अपघातात जखमी झालेल्या आणि राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आज शिवसैनिकांनी भेट घेतली. त्यांना उपचारांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले होते. टुरिस्ट कारमध्ये चालक मोबाईल चार्जिंगसाठी लावत असताना गाडी सुरू झाली होती. चालकाने गाडी थांबविण्याच्या प्रयत्नात ब्रेकऐवजी चुकून एक्सिलेटर दाबल्याने तीन रिक्षा आणि काही पादचाऱ्यांना तिची धडक लागली. अपघातात एका महिलेसह तीन पुरुष आणि तीन मुले असे सात जण जखमी झाले होते. शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख प्रकाश वाणी, शाखाप्रमुख शरद कोथरे, अमोल भंडारे, विजय मयेकर, अजय तिवारी व सचिन भांगे यांनी राजावाडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98051 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..