पामबीच मार्गाला तिरंग्याची झळाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पामबीच मार्गाला तिरंग्याची झळाली
पामबीच मार्गाला तिरंग्याची झळाली

पामबीच मार्गाला तिरंग्याची झळाली

sakal_logo
By

नेरूळ, ता. २२ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या मानवी साखळीमुळे पामबीच मार्गाला तिरंग्याची झळाळी मिळाली. महापालिका मुख्यालय ते सानपाडा येथील मोराज सर्कल अशा सुमारे साडेआठ किलोमीटर अंतरावर हातात तिरंगा असणारे ७ हजार ५०० मीटर लांबीचे कापड धरून नागरिकांनी ही मानवी साखळी यशस्वी केली. या दरम्यान पावसाने हजेरी लावली होती; परंतु तरीसुद्धा पावसात भिजत नागरिकांनी साखळीतील आपल्या सहकाऱ्यांचा हात न सोडता स्वच्छतेचा संदेश देत शहरावरील प्रेम व्यक्त केले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महापालिकेस या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत राष्ट्रीय विक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’चे परीक्षक बी. बी. नायक यांनी हे प्रमाणपत्र व मेडल राजीव गांधी स्टेडियममधील विशेष कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्रदान केले. या मानवी साखळीत शहरातील विविध महिला बचत गट, महिला सामाजिक व स्वयंसेवी संस्था, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य व विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यांच्या सोबतीला पर्यावरणप्रेमींचे समूहसुद्धा सहभागी झाले होते. ओला व सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणे आदी जबाबदाऱ्यांचे नागरिकांनी जनजागृती केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98053 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..