‘विनोबांचे विचार देशाला तारू शकतील’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विनोबांचे विचार देशाला तारू शकतील’
‘विनोबांचे विचार देशाला तारू शकतील’

‘विनोबांचे विचार देशाला तारू शकतील’

sakal_logo
By

कामोठे, ता. २२ (बातमीदार) : हिंसेने समस्या कधीच सुटणार नाही. आपल्याला अहिंसा जीवनात आत्मसात करण्याची गरज आहे. जात, धर्म, पंथ, भाषा हे सर्व भेदून समाजात परिवर्तन घडवायला लागेल. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे विचार देशाला मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बागडे यांनी केले.
सर्वोदय व ग्राम स्वराज्य समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भानघर येथील सर्वोदय आश्रम येथे विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यकर्ता शिबिरात बगाडे बोलत होते. या शिबिरात सुमारे ४० कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते व राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी अनुप कुमार पांडे यांनी विनोबांच्या कामाचा आढावा घेतला. भूदान चळवळ व ग्रामदान चळवळीची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संयोजन शंकर बगाडे, अल्लाउद्दीन शेख यांनी केले होते. संजय गायकवाड, नीतू गायकवाड, मीना पालांडे, संतोष ठाकूर, उदय गावंड, राजेश रसाळ, सुशीला वामन, सुनीता भगत, फातिमा सदावर्ते, रंजना पाटील, तुळशीराम पाटील, डॉ.चॅम्पियन बेंडले, जयवंत पाटील, अविनाश पाटील अरुण पालांडे, उज्वला सांगडे, चंदा कातकरी, कृष्णा सांगडे व इतर प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

आज समाजात महात्मा गांधी यांच्याबद्दल काही जण आणि प्रतिगामी संघटना जाणीवपूर्वक चुकीचे विचार मांडून प्रतिमा मलिन करत आहे. गांधींबद्दल समाजात जे आक्षेप पसरवले जात आहे, त्याची सत्यता सर्वांनी पडताळणी पाहिजे. जगभरात आज अनेक जण गांधी विचारणे प्रेरित होऊन समाजात परिवर्तनाचे काम करत आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनाही जगामध्ये गेल्यानंतर गांधींचेच नाव घ्यावे लागते. हे गांधी विचाराचे यश आहे.
- संकेत मुनोत, गांधी विचारांचे अभ्यासक कार्यकर्ते

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98057 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..