एटीएम फोडताना एकजण ताब्यात दुसरा फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम फोडताना एकजण ताब्यात दुसरा फरार
एटीएम फोडताना एकजण ताब्यात दुसरा फरार

एटीएम फोडताना एकजण ताब्यात दुसरा फरार

sakal_logo
By

पेण, ता. २२ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील कामार्ली येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरारी झाल्याची घटना गुरुवार पहाटेच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील पूर्व विभागातील एटीएम जिलेटिनच्या साह्याने गुरुवारी पहाटेच्या दरम्यान फोडून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणारे दोन आरोपी संशयरित्या रात्रीच्या वेळी गस्तीवर असणारे पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ व त्यांचे सहकारी यांना आढळून आले. यावेळी पुणे जिल्ह्यातील रहिवासी संतोष कांबळे (वय ३४) याला पोलिसांनी शिताफीने पकडले असून दुसरा आरोपी फरारी आहे. या संदर्भात पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तडवी करीत आहेत. या अगोदरही काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी पेण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचा एटीएम फोडून त्यातील जवळपास ६० लाख रुपयांची रोकड लंपास केला होता. मात्र एवढ्या मोठ्या रकमेचा अजूनही तपास लागलेला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98060 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..