रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा
रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा

रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ ः गर्दीच्या वेळी एसी लोकल नको, कळवा येथे कारशेडला लागून स्टार्ट प्लॅटफॉर्म द्या, मेल-एक्स्प्रेसचा भोंगा बंद करून त्या पाचव्या- सहाव्या मार्गिकेवरून चालवा, दिवा लोकल सुरू करा, या मागण्यांसाठी माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या वेळी रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी निदर्शनास आणून देत त्या दूर करण्याची मागणीही रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे केली.
कळवा, मुंब्रा व दिवा भागामधील लोकसंख्येमध्ये मागील २० वर्षांमध्ये सर्वात जास्त वाढ झाली आहे. या स्थानकांमधून रोज अंदाजे ४ ते ५ लाख लोक प्रवास करतात; मात्र ठाणे पुढील प्रवाशांना रोज रेल्वे प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. या समस्या घेऊन आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या वेळी कळवा आणि मुंब्र्यामध्ये २७ नॉन-एसी गाड्यांचा स्टॉप काढून टाकला आहे आणि १२ एसी गाड्यांचा स्टॉप वाढवला आहे, तो रद्द करून त्याबाबत पुनर्विचार करून कार्यवाही करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच कळवावासीयांच्या सोयीसाठी कारशेडमध्ये स्टार्ट प्लॅटफॉर्म तयार करावा आणि दिवा लोकल सुरू करून या प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98066 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..