वसईत महापालिकेचे जलशक्ती अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत महापालिकेचे जलशक्ती अभियान
वसईत महापालिकेचे जलशक्ती अभियान

वसईत महापालिकेचे जलशक्ती अभियान

sakal_logo
By

वसई, ता. २२ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूर मार्फत ‘जलशक्ती अभियान कॅच द रेन- २०२२’ अंतर्गत बहुद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी जनजागृती रॅली काढण्यात आली. जलशक्ती मिशन अभियानात आयुक्त अनिलकुमार पवार, माजी महापौर नारायण मानकर, माजी उपमहापौर, प्रकाश रॉड्रिग्ज, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. जनजागृती रॅलीत शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक व महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाणी साठवणे, पारंपरिक साठ्याचे मार्ग पुनरुज्जीवित करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पाणलोट क्षेत्राचा विकास, वृक्ष लागवड व संवर्धन आदी उपक्रम या वेळी राबवण्यात येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98071 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..