ठाणे पालिकेच्या लाचखोर लिपिकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेच्या लाचखोर लिपिकाला अटक
ठाणे पालिकेच्या लाचखोर लिपिकाला अटक

ठाणे पालिकेच्या लाचखोर लिपिकाला अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे महापालिकेच्या लिपिकास ठाणे एसीबी पथकाने ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. प्रवीण गजेंद्रनाथ सरतापे (वय ४६) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी वर्तकनगर प्रभाग समितीच्या अंतर्गत लोकमान्य नगर पाडा क्रमांक एक येथे फ्लॅट खरेदी केले असून त्यांच्या मालमत्ता हस्तांतरण व टॅक्स पावतीवरील नावात बदल करण्यासाठी त्यांनी प्रभाग समितीत अर्ज केला होता. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समिती मालमत्ता कर विभागात कार्यरत असलेले लिपिक प्रवीण गजेंद्रनाथ सरतापे याने तक्रारदार यांच्याकडून मालमत्तावर नाव लावण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदार यांनी ठाणे एसीबी पथक कार्यालयात फिर्याद दाखल केली होती. एसीबी पथकाने या घटनेची २१ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता सदर लिपिकाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी सापळा रचून एसीबी पथकाने सदर लिपिकास तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98072 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..