मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोटिशीला व्यापारी, रहिवाशांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोटिशीला व्यापारी, रहिवाशांचा विरोध
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोटिशीला व्यापारी, रहिवाशांचा विरोध

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोटिशीला व्यापारी, रहिवाशांचा विरोध

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पोर्ट ट्रस्टच्या जमिनींवर स्थायिक झालेले दुकानदार आणि रहिवाशांची बैठक ईस्टर्न मुंबई लँड युजर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. मुंबई पोर्ट ट्रस्टने दिलेल्या डिमांड नोटीसच्या निषेधार्थ रे रोडवरील दारूखाना बंदर येथे असलेल्या बॉम्बे मरीन इंजिनिअरिंग वर्कर्स येथे ही बैठक झाली. या वेळी हजारो जणांनी उपस्थित राहून त्यांनी मुंबई बंदर प्राधिकरणाने दिलेल्या डिमांड नोटीसचा निषेध केला.
या वेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सूचनेच्या संदर्भात पुढील रणनीतीवर विचार व्यक्त करत सर्व व्यापारी व रहिवाशांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत सीएएएमआईटीचे अध्यक्ष मोहन गुरुनानी, ॲड. प्रेरक चौधरी, डीआयएसएमएचे उपाध्यक्ष राजीव खंडेलवाल, परवेझ उपर, इब्राहिम सूर्या, प्रीती शेनॉय, दिशामा अध्यक्ष अशोक गर्ग, हरिद्वार सिंग, सुभाष गुप्ता आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व व्यापारी, दुकानदार व रहिवासी व कामगारांनी संघटित होऊन या नोटिशीच्या विरोधात लढण्याचे आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98079 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..