पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

sakal_logo
By

भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : ट्रान्स्पोर्ट व्यवसायिक वाहनचालकाकडून मासिक ३० हजारांचा हप्ता घेणारा पोलिस नाईक गुरुवारी ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. भरत शरद जगदाळे असे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिस नाईकचे नाव असून तो पडघा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पडघा कल्याण रस्त्यावर महत्त्वाच्या तळवली फाट्यावर तो कर्तव्यावर असताना त्याने एका ट्रान्स्पोर्ट व्यवसायिक वाहनचालकाकडून ट्रान्स्पोर्ट व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी महिना ३० हजार रुपये हप्ता मागितला होता. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाने याबाबत थेट ठाणे लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता. लाचलुचपत विभागाने तळवली नाका येथे सापळा लावला असता पोलिस नाईक जगदाळे याने हप्त्याची तडजोडीअंती ठरलेली २० हजार रुपयांची रक्कम घेताना तो जाळ्यात अडकला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98086 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..