National Cinema Day : ७५ रुपयांच्या तिकिटामुळे मल्टिप्लेक्स हाउसफूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Cinema Day  movie ticket at 75 rupees
७५ रुपयांच्या तिकिटामुळे मल्टिप्लेक्स हाउसफूल

National Cinema Day : ७५ रुपयांच्या तिकिटामुळे मल्टिप्लेक्स हाउसफूल

मुंबई : संपूर्ण देशात उद्या राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात मल्टिप्लेक्स असोसिएशनने ७५ रुपये तिकीट दर ठेवला आहे. या तिकीट दरामुळे राज्यातील बरीच मल्टिप्लेक्स हाऊसफुल्ल झाली आहेत. चित्रपट व्यवसायाला अधिक चालना मिळावी, याकरिता मल्टिप्लेक्स असोसिएशनने राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यासाठी ७५ रुपये तिकीट दर जाहीर केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्‍यान उद्या ‘धोका राऊंड द कॉर्नर’, ‘चूप’, ‘प्रेमगीत ३’ हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अशा वेळी मल्टिप्लेक्स असोसिएशन ७५ रुपयांत सिनेमा दाखवत असल्‍याने प्रेक्षकांना मेजवानी मिळाली आहे.

या उपक्रमाबद्दल मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सचिव प्रकाश चाफळकर यांनी सांगितले की, चित्रपटप्रेमींना सिनेमागृहांकडे वळवण्याचा आमचा माफक हेतू आहे. तसेच वर्षातून एकदा प्रेक्षकांना चित्रपटाची अशी मेजवानी मिळावी, हा आमचा प्रयत्न होता आणि आमच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कनाकिया म्हणाले की, राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आम्ही मूव्हीमॅक्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट दाखवणार आहोत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98087 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..