अवघ्या सात तासात मुलीची भिक्षेकऱ्याकडून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या सात तासात मुलीची भिक्षेकऱ्याकडून सुटका
अवघ्या सात तासात मुलीची भिक्षेकऱ्याकडून सुटका

अवघ्या सात तासात मुलीची भिक्षेकऱ्याकडून सुटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः शहरात लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. गुरुवारी (ता. २२) आरपीएफ कर्मचारी, रेल्वे स्थानकावरील महिला व आमदार राजू पाटील यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे सातवर्षीय मुलीची अवघ्या सात तासांत भिक्षेकऱ्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात निल्या काळे (वय ८२) व नाशिका काळे (वय ७२) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
गुरुवारी (ता. २२) रात्री माया कोठावदे व सायली शिंदे या प्रवासी महिला रेल्वे स्थानकातून प्रवास करत असताना त्यांनी एका भिक्षेकरी महिलेसमोर एक लहान मुलगी झोपलेली पाहिली; परंतु ती मुलगी तिची नसावी, असा संशय आल्याने त्यांनी तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी लागलीच याची माहिती आरपीएफ, जीआरपी यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली असता तेथे ती महिला व मुलगी आढळून आली नाही.
लता अरगडे यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना ही बाब सांगितली. त्यांनी लगोलग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे पोलिस, आरपीएफ यांना ट्विट करत या घटनेत लक्ष घालण्याची मागणी केली. डोंबिवली आरपीएफचे पोलिस निरीक्षक यशोदा यादव, पोलिस उपनिरीक्षक सुहास मनोहर आणि रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी रेल्वे स्टेशन परिसरात त्यांचा शोध सुरू केला. तसेच मनसेचे पदाधिकारी संदीप म्हात्रे व प्रेम पाटील यांनीदेखील या परिसरात महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. कल्याण दिशेच्या ब्रिजवर ही महिला आपल्या पती व लहान मुलीसह आढळून आली. पोलिसांनी त्या महिलेला व तिच्या नवऱ्याला अटक करून अवघ्या सात तासांत मुलीची सुटका करण्यात आली.
चौकट
स्वतःचीच नात असल्याची माहिती
दोन्ही आरोपी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील बिटकेवाडी येथील असून ते डोंबिवली रेल्वे स्थानकात भीक मागून आपली गुजराण करतात. त्यांच्याजवळ सापडलेली सातवर्षीय मुलगी आशिना भोसले ही त्यांची नात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुहास मनोहर यांनी दिली. सध्या त्या मुलीची चाईल्ड केअरमध्ये रवानगी केली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98110 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..