शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते धारावीत आमनेसामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते धारावीत आमनेसामने
शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते धारावीत आमनेसामने

शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते धारावीत आमनेसामने

sakal_logo
By

धारावी, ता. २३ (बातमीदार) : एका माजी शिवसेना शाखाप्रमुखाचा शिंदे गटात सहभागी होण्याच्या कार्यक्रमादरम्यान गुरुवारी रात्री दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिक आणि शिंदे गट घोषणाबाजी करत हॉलबाहेर एकमेकांना भिडल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. शिंदे गटाने शिवसैनिकांविरोधात आज धारावी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अधिक तपास सुरू आहे.

संत रोहिदास मार्गावरील अशोक मिल कम्पाऊंडलगत असलेल्या एका शाळेच्या हॉलमध्ये दादरचे आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली धारावीतील माजी शाखाप्रमुख रवी कोडम शिंदे गटात सहभागी होणार होते. त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याआधी शिंदे गटात सहभागी झालेले धारावीतील तीन ते चार कार्यकर्ते हॉलमध्ये गर्दी जमवण्यासाठी धावपळ करत असल्याची माहिती स्थानिक शाखाप्रमुखांना मिळाली. त्यानुसार शिवसेना धारावी विधानसभा समन्वयक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आदींनी तत्काळ शिवसैनिक आणि युवा सैनिकांसह घटनास्थळी धाव घेतली. कार्यक्रम आटोपून शिंदे गटाचे कार्यकर्ते हॉलमधून बाहेर पडताच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. परिणामी शिवसेना शाखाप्रमुख आणि शिंदे गटात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. धारावी पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. वातावरण तापल्याचे पाहून धारावी पोलिस आमदार सरवणकर यांना दुसऱ्या मार्गाने घेऊन गेले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98115 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..