डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. २३ ः भारतीय रुपयाची किंमत आज ३८ पैशांनी घसरून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८१.२४ इतकी झाली आहे. रुपयाचे हे आतापर्यंतचे सर्वात कमी मूल्य आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली कपात यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.८६ वर बंद झाला होता. आज ८१.०६ वर रुपयाची सुरुवात झाली. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने बुधवारी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली. फेडरल रिझर्व्हने आता व्याजदर ३-३.२५ टक्के केले आहेत. महगाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदर वाढवल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत महागाईने गेल्या चाळीस वर्षांतील उच्चांक गाठला आहे.
रुपयाची किंमत घसरल्यामुळे भारतीयांना अमेरिकेत निर्वाह करणे अवघड जाणार आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एका डॉलरसाठी ८१ रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्कापासून अन्न आणि इतर गोष्टी महाग होणार आहेत. डॉलरच्या तुलनेत कुठल्याही चलनाचे मूल्य घटणे म्हणजे ते चलन कमजोर झाल्याचे लक्षण मानले जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98117 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..