जयपूर रग्सची ‘रग उत्सव’ची घोषणा केली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयपूर रग्सची ‘रग उत्सव’ची घोषणा केली
जयपूर रग्सची ‘रग उत्सव’ची घोषणा केली

जयपूर रग्सची ‘रग उत्सव’ची घोषणा केली

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : भारतातील सर्वात मोठे हात बनावटीचे रग उत्पादक जयपूर रग्सने आपल्या आजवरच्या सर्वात मोठ्या उत्सव बोनांझाची घोषणा केली. या वर्षी या उत्सवाचे नाव ‘रग उत्सव-नॉट-सो-ऑर्डीनरी’ असून हा उत्सव २४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. जयपूर रग्स नवरात्र आणि दसऱ्यादरम्यान १०,००० पेक्षा जास्त रग्स, शेकडो स्टाइल्स आणि हजारो रंगांमध्ये विशेष डील्समध्ये ६० टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे.

या वेळी आशीष शाह, विनीता चैतन्य, गौरी खान, कवी, तान्या आणि संदीप खोसला, शांतनु गर्ग आणि इतर अनेक जागतिक कीर्तीच्या डिझाइनर्सच्या संग्रहाबरोबरच हाताने विणलेल्या, हँड टफ्टेड, हँडलूम आणि फ्लॅटविव्ह सतरंजांवरदेखील सवलत मिळेल. डिझाईनचे शौकीन जयपूर रग्सची वेबसाईट, दिल्ली, मुंबई, जयपूर आणि बंगळूरस्थित रिटेल स्टोर्स आणि चेन्नई, हैदराबाद व अहमदाबाद येथील स्टोअर-इन-स्टोर्सकडून या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

या सवलतींच्या व्यतिरिक्त, जयपूर रग्स संपूर्ण भारतात मोफत डिलिव्हरी आणि आपल्या उत्पादनांवर दोन वर्षांपर्यंतची वॉरंटी यांसारख्या मूल्यवर्धित सेवा देते. जयपूर रग्स एक नावीन्यपूर्ण डागरोधक कोटिंग देखील सादर करत आहे. ज्यामुळे कोणतेही द्रव्य रगवर सांडले तरी रग सुरक्षित राहतो. ही डागरोधक सेवा जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठी देण्यात येणारी एक अतिरिक्त सेवा आहे; पण कोणत्याही ब्रॅंडच्या रगवर ते वापरता येऊ शकते. हा ब्रॅंड इंटिरियर डिझाइनर्स आणि रग विशेषज्ञाकरवी मोफत व्हर्चुअल सल्लादेखील ऑफर करतो. जेणेकरून रग आणि कार्पेट विकत घेताना ग्राहक सर्व माहितीचा उपयोग करून योग्य निवड करू शकतो. जयपूर रग्सचे संचालक योगेश चौधरी म्हणाले, आमच्या ग्राहकांना आमच्या प्रसिद्ध डिझाइनर्सच्या दर्जेदार श्रेणीतील सर्वोत्तम कलेक्शनचा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून या उत्सवी वातावरणात आणखी रंगत येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98118 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..