तात्काळ वजन कमी करण्याचा परिणाम हृदयावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तात्काळ वजन कमी करण्याचा परिणाम हृदयावर
तात्काळ वजन कमी करण्याचा परिणाम हृदयावर

तात्काळ वजन कमी करण्याचा परिणाम हृदयावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : ज्येष्ठ हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. ट्रेडमिलवर व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ट्रेडमिल एक अशी मशीन आहे जी आजकाल सर्वच जिममध्ये पाहायला मिळते. हा कार्डिओ एक्सरसाइजमध्ये मोडणारा एक प्रकार आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांत देशामध्ये व्यायाम करताना अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. याविषयी कार्डिओ थोरॅसिक आणि रक्तवाहिन्यासंबंधी शल्यचिकित्सक व प्लॅटिनम हॉस्पिटलचे संचालक डॉ. बिजॉय कुट्टी सांगतात, ‘‘राजू श्रीवास्तवच नाही तर याआधी सिद्धार्थ शुक्ला आणि साऊथ इंडियन अभिनेता पुनीत राजकुमार यांनासुद्धा अशाच प्रकारे हृदयविकाराचा सामना करावा लागला होता. यात त्यांचा मृत्यू झाला होता. नियमित व्यायामामुळे तुमची हृदयगती वाढते, तुमच्या हृदयाचे स्नायू सुधारतात आणि तुमची फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यास मदत होते. मात्र, अतिव्यायाम करण्याचे फॅड वाढत चालले आहे. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर हृदय सक्षम करण्यासाठी व्यायाम करायचा असेल तर सक्षम चाचणी करून घेणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी, साखरेची तपासणी तसेच रक्तदाब तपासणे गरजेचे आहे.’’
......................................
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अतिश्रम असणारे व्यायाम हे हृदयरोगाने पीडित असणाऱ्या लोकांमध्ये कार्डियाक अरेस्टची समस्या निर्माण करू शकतात. शिवाय यामुळे जीव जाण्याचासुद्धा मोठा धोका असतो. हार्ट रिदम डिसऑर्डर याचादेखील धोका अधिक जास्त असतो. हृदयातील अडथळे हे पेशी आणि कोलेस्ट्रॉलचे कण एंडोथेलियल पेशींचा अडथळा तोडून धमनीच्या अस्तरात घुसखोरीमुळे होते. त्यामुळे धमनीमध्ये प्लेक नावाचा बंप तयार होतो. हृदयावर प्रेशर आल्यामुळे प्लेक फुटण्याचा धोका निर्माण होऊन पुढे हृदयविकाराचा झटका येतो.

कोट
आजच्या धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे आणि आहारातील बदलांमुळे लठ्ठपणाची समस्या सामान्य झाली आहे. वाढत्या वजनातून मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे, सांधेदुखी, अपचन, पित्त, निरुत्साह असे आजार होतात. त्याचप्रमाणे बाळंतपणानंतर, आनुवंशिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळेही शरीराचा आकार बिघडू शकतो. म्हणूनच हृदय किती सक्षम आहे याची तपासणी करून घेणे गरजेचे असते.
- डॉ. संजय तारळेकर, हृदयविकार तज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98130 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..