परिवहन विभागामध्ये बदल्यांचे वारे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिवहन विभागामध्ये बदल्यांचे वारे सुरू
परिवहन विभागामध्ये बदल्यांचे वारे सुरू

परिवहन विभागामध्ये बदल्यांचे वारे सुरू

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ ः राज्य सरकारच्या बदली अधिनियम २००५ नुसार महसूल विभागनिहाय लिपिकवर्गीय कर्मचारी आणि वाहनचालकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच ठिकाणी सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण बदली करण्यात येते. बदल्यांसाठी राज्यातील आरटीओ आणि एआरटीओ अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे.
गट ‘क’मधील कर्मचारी व वाहनचालकांच्या विभागांतर्गत सर्वसाधारण बदल्यांचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या गट ‘क’मधील कर्मचारी वाहनचालकांच्या बदल्या परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर केल्या जातात. आकृतिबंधाच्या पार्श्वभूमीवर नवीन नऊ प्रादेशिक परिवहन कार्यालयांना मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या अखत्यारीतील कार्यालयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये गट ‘क’ व गट ‘ड’मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महसूल विभागाच्या स्तरावर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून सात दिवसांत बदल्यांसदर्भातील सविस्तर अभिप्राय परिवहन आयुक्त कार्यालयाने मागितला आहे.

स्टेनोच्याही बदल्या?
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्त असलेल्या स्टेनोच्या बदल्यांचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याबाबतच्या तक्रारीही परिवहन आयुक्त कार्यालयाकडे आल्या आहे. त्यामुळे आता स्टेनोच्या बदल्याही होतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98142 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..