२० खड्डेमय रस्त्यांसाठी आठवड्याभरात अॅक्शन प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२० खड्डेमय रस्त्यांसाठी आठवड्याभरात अॅक्शन प्लॅन
२० खड्डेमय रस्त्यांसाठी आठवड्याभरात अॅक्शन प्लॅन

२० खड्डेमय रस्त्यांसाठी आठवड्याभरात अॅक्शन प्लॅन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात पालिकेने रस्त्यावरील तब्बल ३४ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यांवर खड्डे पडून झालेल्या दुरवस्थेसाठी पालिकेला चांगलेच सुनावले आहे. तसेच खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठीचा आराखडाही सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिका एका आठवड्यात २० रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीचा आराखडा तयार करणार आहे. हा आराखडा मुंबई महानगरपालिकेकडून उच्च न्यायालयाला आठवड्याभराच्या कालावधीत सादर करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईतील २० रस्त्यांबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती दर्शवत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही मुंबईच्या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांबाबत पालिकेच्या कामावर उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती दर्शवली होती. त्याच वेळी पालिकेला या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून सादरीकरण करण्याचेही आदेश दिले. मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या सूचननेनुसार येत्या आठवड्याभरात मुंबईत खराब झालेल्या २० रस्त्यांच्या दुरुस्ती कामाचा आराखडा तयार करण्यात येईल. तसेच उच्च न्यायालयातही सादर करण्यात येईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

चौकट
आजतागायत ३३ हजारांहून खड्डे बुझवले
मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या रस्त्यांवरील एकूण ३३ हजार ९२२ खड्डे आतापर्यंत बुजवले आहेत. त्यापैकी २६ हजार ६०२ खड्डे हे कोल्डमिक्सने बुजविण्यात आले आहेत; तर कंत्राटदाराच्या माध्यमातून ६ हजार ४ इतके खड्डे बुजवण्यात आले. सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून १,३१६ खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. एकूण ४१ हजार २६५ चौरस मीटरचे रस्ते पालिकेने कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवले आहेत; तर कंत्राटदार एजन्सीने ३१ हजार ६४९ चौरस मीटरचे खड्डे आणि पॅच दुरुस्त केले आहेत.

कोट
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या २० रस्त्यांच्या ठिकाणची आम्ही पाहणी करत आहोत. एकदा हे २० रस्ते निश्चित झाले की या ठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी तातडीने सुरुवात करण्यात येईल. तसेच उच्च न्यायालयालाही हा आराखडा लवकरच सादर करण्यात येईल.
- पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98146 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..