उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!
उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!

उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २५) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे -
कुठे - माटुंगा- ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
परिणाम-
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील; तर कल्याण येथून अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
..........
हार्बर रेल्वे -
कुठे - सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी - ११. १० ते ४.१० वाजेपर्यंत
परिणाम -
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे; तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे-
कुठे - सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम-
या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सर्व धीम्या उपनगरीय गाड्यांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबे दिले जातील, तर जलद मार्गावर फलाट उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही दिशेच्या उपनगरीय गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. तर या ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द असणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98147 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..