जीएसटी चोरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटी चोरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
जीएसटी चोरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

जीएसटी चोरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. २३ ः छत्तीसगडमधील सात कंपन्यांच्या विरोधात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कंपन्यांनी ६८ कोटी रुपयांपेक्षा अधिक जीएसटी चोरी केल्याचा आरोप आहे. या कंपन्या राज्यात, तसेच राज्याबाहेरील करदात्यांना नकली आयटीसी बिले देत होती, असे सांगण्यात येत आहे. येणाऱ्या काळात आयटीसी रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बिजोटिक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डन ट्रेडर्स, एआरएल ट्रेनिंग कंपनी, देवी ट्रेडिंग कंपनी, बद्री एंटरप्राइजेस, कुमार ट्रेडर्स आणि सिंह ब्रदर्स या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जीएसटी विभागाचे प्रधान सचिव अतुल गुप्ता यांनी सांगितले, या कंपन्या कुठल्याही वस्तूंचा पुरवठा केल्याशिवाय आयटीसी मिळवत होत्या. या कंपन्यांनी ६८.०४ कोटींची जीएसटी चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98148 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..