शाळकरी मुलांना गांजा विकणाऱ्या महिलेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळकरी मुलांना गांजा विकणाऱ्या महिलेला अटक
शाळकरी मुलांना गांजा विकणाऱ्या महिलेला अटक

शाळकरी मुलांना गांजा विकणाऱ्या महिलेला अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : शाळकरी मुलांना गांजासह इतर अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (ता. २३) दहिसर पश्चिम येथील शिवाजीनगर येथे ही कारवाई करण्यात आली. बिल्किश खान (वय ५२) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेकडून २३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, बिल्किश खान ही महिला बऱ्याच दिवसांपासून शाळकरी मुलांना गांजा; तसेच इतर अमली पदार्थांची विक्री करत असे. याबाबत बोरिवली पश्चिम येथील एमएचबी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. यानुसार पोलिसांनी कारवाई करत दहिसर पश्चिम येथील शिवाजीनगर परिसरातील महिलेच्या घरावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान महिलेच्या घरातून २३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही महिला शाळकरी मुलांना बोलावून अमली पदार्थ देत असे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. सध्या या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्याकडून गांजाही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास एमएचबी पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98151 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..